मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील गोपाळकृष्ण गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील १,३५० मिलीमीटर व्यासाचे प्रवाह नियंत्रण झडप (फ्लो कंट्रोल वॉल्व्ह) दुरूस्ती आणि वेसावे जलवाहिनीवरील ९०० मिलीमीटर व्यासाचे फुलपाखरु झडप (बटरफ्लाय वॉल्व्ह) बदलण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. गुरुवार १९ जून रोजी दुपारी २ वाजेपासून शुक्रवार २० जून रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत एकूण ११ तास हे काम करण्याचे नियोजित आहे. या कामादरम्यान संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा ११ तास बंद करावा लागणार आहे. त्यामुळे के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुरूस्ती कालावधीत म्हणजे गुरुवार १९ जून रोजी दुपारी २ वाजेपासून शुक्रवार २० जून रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत के पश्चिम विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
या पाणीपुरवठा विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद …
पार्ले पश्चिम : लल्लूभाई उद्यान, लोहिया नगर, पार्ले गावठाण, मीलन भूयारी मार्ग (सबवे), जुहू विलेपार्ले विकास योजना (जे. व्ही. पी. डी. स्कीम), जुहू गावठाण क्रमांक ०३, व्ही. एम. मार्ग, विलेपार्ले (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०)
मोरागाव (जे. व्ही. पी. डी.) : मोरागाव, जुहू गावठाण क्रमांक ०१ आणि ०२, विलेपार्ले (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०)
गिलबर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) : जुहू गल्ली, धनगरवाडी, सागर सिटी सोसायटी, अंधेरी (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – रात्री १० ते मध्यरात्री १२.३०)
कृपया संबंधित भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.