मांडव्यातील महिलावर्गानी सांभाळली लोढा प्रकल्पातील खानावळ

0

अलिबाग : मांडवा गावातील आठ गृहिणींनी लोढा डेव्हलपर्सच्या अलिबागमधील बांधकाम प्रकल्पातील खानावळीची जबाबदारी स्वीकारली आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून लोढा कंपनीने हा उपक्रम सुरू केला असून, या महिलांना स्वयंपाकघरासाठी जागा आणि साहित्यही मोफत उपलब्ध करून दिले आहे. स्थानिकांना उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लोढा  डेव्हलपर्सने मांडवा गावातील महिलांच्या गटाला त्यांच्या बांधकाम प्रकल्पातील कॅन्ट्रीन चालवण्याची जबाबदारी दिली आहे. आठ गृहिणींचा हा गट आता बदला पालट करून कॅन्टीन सुरू केली आहे. आणि बांधकाम साइटवरील कामगारांना ताजे, घरगुती जेवण पुरवत आहे.

“ही बातमी गावात पसरताच मांडव्यातील महिलांनी बैठक बोलावली. आम्हाला स्वयंपाकघरासाठी सामान जमा करायचे होते, जेवण बनवायचे होते आणि कर्मचाऱ्यांना पुरवायचे होते. आम्ही कमावलेला नफा आमचाच असेल, फक्त जागा लोढा कंपनी देणार होती. थोड्या चर्चेनंतर आम्ही आठ जणींनी एकत्र येऊन कॅन्टीन चालवायचे ठरवले,” असे मांडव्यातील रहिवासी नमिता आशिष गावंड यांनी सांगितले. या सर्व महिलांनी मिळून किराणा, फ्रिज, व्यावसायिक स्टोव्ह आणि भांडी खरेदी करण्यासाठी पैसे गोळा केले. अवघ्या आठवड्यात स्वयंपाकघर तयार झाले. लोढा कंपनीने जागा आणि फर्निचर मोफत दिले. हा गट आता शिफ्टमध्ये स्वयंपाकघर चालवतो. एका वेळी त्यापैकी तीन जणी स्वयंपाक करतात, जेवण वाढतात आणि स्वच्छता करतात. या उपक्रमामुळे या महिलांना खूप समाधान मिळत आहे.

“आमच्यापैकी बहुतेकांनी याआधी कधी बाहेर काम केले नव्हते. ही आमच्यासाठी पहिलीच संधी होती, विशेषतः कारण आम्ही कॅन्ट्रीन चालवून नफा कमवणार होतो. आम्ही खूप आनंदी आहोत, कारण आम्हाला काम मिळाले आहे आणि आम्ही दरमहा आठ ते दहा रुपये घरी घेऊन जातो,” असे कामिनी प्रशांत म्हात्रे यांनी सांगितले. कामिनी यांच्या पतीचे कर्करोगाने नुकतेच निधन झाले होते, आणि त्या आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी धडपडत होत्या. लोढा कंपनीसाठी ही परिस्थिती फायदेशीर आहे. “आमच्या कर्मचाऱ्यांना घरगुती व ताजे जेवण मिळते आणि कॅन्टीन चालवणाऱ्या महिलांना रोजगार मिळाला आहे. स्थानिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत जवळून काम करत आहोत,” असे लोढा कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech