श्रीवर्धनमधील उबाठाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी बांधले हाती घड्याळ

0

मुंबई : १६ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्या सोबत येत आहात हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर प्रवेशाबद्दल मत व्यक्त केले. १९९५ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला श्रीवर्धन राहिला होता. त्यावेळी राजकीय संघर्ष होता पण कोणताही मनभेद नव्हता. मी जेव्हा या मतदारसंघात निवडून आलो त्यानंतर परिवर्तन घडून आले. तुमची पक्षाशी निष्ठा राहिली म्हणून मला तिथे कमी मतदान मिळाले अशी कबुलीही सुनिल तटकरे यांनी दिली. तुमच्या धाटणीला बाजुला सारून तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधील झाला आहात हा श्रीवर्धनच्या राजकीय इतिहासात दिवस उजाडला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज जाहीर प्रवेश केला. यावेळी उबाठाचे रायगड संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर, श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती बाबुराव चोरगे, कारीवणे गावच्या सरपंच गीता चोरगे, जगन्नाथ चाळके, गणेश निर्मळ, बबन जोशी, मालती पवार, जागृती चाळके, रोशन मोरे यांच्यासह मराठा, कुणबी समाज संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही जाहीर प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी,सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सुभाष केकाणे आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech