हिंदी भाषा सक्तीला आमदार मिटकरींचा पाठिंबा

0

अकोला : हिंदी भाषा सक्तीचा वाद आता चिघळाय, आता मनसे याला विरोध करतेय… पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शासन निर्णय दाखवत विरोधासाठी कोणी विरोध करू नये, असा सल्ला दिलाय… शासन निर्यायत कुठंही मराठी भाषेवर अन्याय होणार नाही, अस सरकारने तरतूद केलेली आहे. पण हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने देशभर बोलली जाते. शासन निर्णयामध्ये पहिली ते पाचवी साठी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा वापरली जावी अस निर्णयात सांगितलं आहे. यात हिंदी ही तृतीय भाषा म्हटलं आहे. इतर भाषेचा सन्मान करत मराठी भाषेला कुठंही धक्का लागणार नाही याची शासन निर्णयात घेतल्या गेले आहे.

शिवाजी महाराजांना सात भाषा यायच्या तर संभाजी महाराजांना १७ भाषा यायच्या…. जर आपल्याला जागतिक स्थरावर जायचं असेल तर आपल्या सगळ्या भाषा यायला पाहिजे… पण आता फक्त विरोधासाठी विरोध करावा… तुम्ही मराठी भाषेसाठी लढा लढता पण मराठी भाषिकांचे किती खाद्य पदार्थांची दुकाने आहेत, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय. दरम्यान हॉटेल वर सर्रास मिळणारी इडली, डोसा, मेंदूवडा हे दक्षिणचे खाद्य पदार्थ असताना , आपला उपमा, चणापोहे हरवली असल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. म्हणून मराठीचा मुद्दा पुढे करून सरकारला कोणी बदनाम करूनये असा सल्लाही मिटकरी यांनी दिला आहे.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech