जळगाव : जळगावच्या सुवर्णबाजारात चांदी दरात एकाच दिवसात २ हजारांची वाढ होऊन चांदीचे दर १,११,२४० रुपये किलोच्या नव्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले तर सोने २०० रुपयांनी स्वस्त झाले आहे चांदी १,०९,१८० रुपये किलोवर स्थिर होती. इराणने निकराच्या युद्धाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी दुपारपासून चांदीत २ हजारांची वाढ झाली.
गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाली. मात्र सोन्यात २०० रुपयांची घसरण झाली. सोमवारी १,०२,५८८ रुपये तोळा असलेले सोने १,०२,३८२ रुपयांवर स्थिरावले. १ जूनला चांदी १,०१,४५५ रुपये किलो होती. ५ जूनला एकाच दिवसात चार हजारांची तेजी आली. नंतर ५ जूनपासून १२ जूनपर्यंत १,०८, १५० रुपये किलो होती. नंतर एक हजारांची वाढ पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता झाल्याने १३ जूनला ती १,०९,१८० रुपये झाली. तर १३ जूनपासून १६ जूनपर्यंत चार दिवस १,०९,१८० रुपयांवर स्थिरावली होती. १७ जूनला इस्त्रायल इराणमधील युद्धाच्या भडक्याने एकाच दिवसात दोन हजारांची वाढ झाली आहे.