पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

0

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज(दि.१९)वाढदिवस आहे. त्यानिमित्त राहुल गांधी यांना देशातील जनता, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी लिहिले की,”लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा”.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी नवी दिल्लीमध्ये झाला होता. राहुल गांधी यांनी २००४ साली राजकारणात पदार्पण केले होते. तसेच पहिल्याच निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, काही वर्षे त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवले होते. तसेच २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातून निवडून आले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech