शाहरुखच्या ‘किंग’ चित्रपटात दिसणार ब्रिटिश गायक एड शीरन

0

मुंबई : ब्रिटिश गायक एड शीरनचे असंख्य चाहते आहेत. फक्त परदेशातच नाही तर भारतातही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. एड शीरन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, त्याचा हा डेब्यू शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटातून होणार असल्याचं बोललं जातंय. ‘किंग’ हा शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे, ज्यात त्याच्यासोबत त्याची मुलगी सुहाना खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजोय घोष करत असून, निर्मितीची बाजू रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि सिद्धार्थ आनंद यांच्याकडे आहे. नुकतंच एड शीरननं एक BTS व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो अरिजीत सिंगसोबत स्कूटरवर फिरताना आणि पंजाबीत गाणे गाताना दिसतोय. व्हिडीओमध्ये ते स्टुडिओत गाणं रेकॉर्ड करतानाही दिसलेत. विशेष म्हणजे, त्या स्टुडिओत ‘किंग’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद देखील उपस्थित होते. ज्यामुळे चर्चेला अधिक उधाण आलं.

एड शीरनच्या एका फॅन क्लबने इंस्टाग्रामवर ती क्लिप शेअर केली. यावर एड शीरनने कमेंट केली की, “हिंदी गाणं शाहरुख खानच्या बॉलिवूड चित्रपटासाठी आहे. अरिजीतसोबतचं ‘सॅफायर’ हे गाणं मात्र पंजाबी व्हर्जन आहे. सध्या मी सर्व भाषांमध्ये गातोय!”, असं त्यानं म्हटलं. एड शीरन सध्या त्याच्या ‘सॅफायर’ या नवीन गाण्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात शाहरुख खान आणि अरिजीत सिंग खास भूमिकेत दिसून येतात. एड शीरनने या गाण्याचं शूटिंग यावर्षी भारतात त्याच्या ‘मॅथेमॅटिक टूर’ दरम्यान केलं होतं. त्यानं स्वतः खुलासा केला की, “भारतात मी तीन आठवड्यांहून अधिक काळ या म्युझिक व्हिडिओसाठी शूट केलं, आणि हा वेळ माझ्या इतर कोणत्याही गाण्याच्या तुलनेत सर्वाधिक होता”.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech