अहिल्यानगर : भारतीय जनता पार्टी चे गुजरात चे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र भेट देण्यात आले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने १८३ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय बी के डॉक्टर दीपक हरके यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना भेटून पुण्यात बाणेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बनविण्यात आलेल्या सर्वात मोठ्या ग्रिटींग कार्ड ची इंग्लंड च्या ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड मधे नोंद झाल्याचे प्रमाणपत्र भेट दिले. यावेळी डॉक्टर दीपक हरके यांनी केलेल्या या विश्वविक्रमाबद्दल सी आर पाटीलयांनी अभिनंदन केले व दिल्ली मध्ये पुन्हा भेटीचे निमंत्रण दिले.