एअर इंडियाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेला पाठणार

0

अहमदाबाद : एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो. अपघातग्रस्त बोईंग ड्रीमलायनर विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या दिवशी सापडला.विमानात आग लागल्यानंतर ब्लॅक बॉक्स इतका खराब झाला आहे की त्यातून डेटा मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे तो तपासासाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद येथे उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या घटनेत विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी बचावला. या घटनेत एकूण २७० जणांचा मृत्यू झाला. या विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे २ भाग म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) – उष्णता आणि आगीमुळे खराब झाले. देशात अशी कोणतीही प्रयोगशाळा नाही जिथे डेटा पुनर्प्राप्त करता येईल. या कारणास्तव, आता त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या (एनटीएसबी) प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा आणि गोपनीयता राखण्यासाठी सरकारी अधिकारी देखील त्यांच्यासोबत असतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech