मुंबई विमानतळावर २४.६६ कोटींचा गांजा जप्त

0

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारीसीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत २४. ९६ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत २४ कोटी ६६ लाख रुपये आहे. याप्रकरणी २ विमान प्रवाशांसह एका इसमाला अटक करण्यात आलीय. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना गांजा तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार १८ जून रोजी बँकॉकहून येणाऱ्या २ प्रवाशांना अडवण्यात आले. त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली असता व्हॅक्यूम-सील केलेल्या पॅकेटमध्ये हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. या दोन्ही आरोपींकडून गांजाची डिलीव्हरी घेण्यासाठी आलेल्या आणखी एका इसमालाही अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी टोळीचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे, त्यांच्या कारवायांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech