करण जोहर द ब्रायडल रिट्रीटचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

0

मुंबई : भारतातील वधूंसाठीची पहिली-वहिल्या प्रकारची अनुभवात्मक संकल्पना असलेल्या ‘द ब्रायडल रिट्रीट’तर्फे प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याची अधिकृत ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. मुळात, ‘द ब्रायडल रिट्रीट’ फक्त लग्नाच्या दिवसापुरते मर्यादित नाही. तर वधूंना भविष्यातील आयुष्यासाठी तयार करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे.

यावेळी करण जोहर म्हणाला की, “मी अनेक वर्षे चित्रपटांद्वारे प्रेमकथा सांगितल्या आहेत – पण ‘द ब्रायडल रिट्रीट’ पडद्यामागील कथेबद्दल आहे,” “हे लग्नानंतरची जाणीव यासाठी स्त्रियांना तयार करण्याबद्दल आहे. लोकांनी वधूला भेटण्यापूर्वी वधूला स्वतःला पारखण्याची संधी मिळते”

ई-फॅक्टर एक्सपीरियन्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, समित गर्ग सांगतात की, “’द ब्रायडल रिट्रीट’ ही केवळ एक संकल्पना नाही ती एक वचनबद्धता आहे. हे ओळखते की लग्न हा एक महत्त्वाचा टप्पा असला तरी, स्त्रीचा प्रवास कसा आकार घेतो हे खऱ्या अर्थाने या नवीन टप्प्यात ती कशी प्रवेश करते यावर अवलंबून असते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech