लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गिल-जयस्वालचे शतक

0

लंडन : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने शतक झळकावत भारतीय संघाला ३५० धावांचा टप्पा पार करुन दिला आहे. भारताने कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ३ बाद ३५९ धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार शुभमन गिल १२७ धावांवर आणि उपकर्णधार ऋषभ पंत ६५ धावांवर नाबाद खेळत आहेत. शुभमन गिलच्या भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात आश्वासक केली आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी सलामीवीर यशस्वी जयस्वलने १०१ धावांची खेळी करत इंग्लंडमधील आपले पहिले शतक झळकावले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाबरोबर खेळताना आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळी केली आहे.

कर्णधार शुभमन गिलनेही लौकीकाला साजेसा खेळ करत नाबाद १२७ धावांची खेळी केली आहे. विजय हजारे, सुनिल गावस्कर आणि विराट कोहलीनंतर कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच कसोटीत शतकी खेळी करणारा तो भारताचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६ शतके झळकावली आहेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थित भारतीय फलंदाजांनी आपली वेगळी छाप सोडण्याच यश मिळवलं आहे. आता कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय फंलदाज पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभी करण्यास प्रयत्नशील असतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech