नवी दिल्ली : पुरुषांच्या प्रो लीग हॉकीच्या युरोपियन लेगमध्ये भारताला उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमकडून ३-६ असा पराभव झाला. भारताचा या सामन्यातील हा सलग सातवा पराभव ठरला. आर्थर व्हॅन डोरेनने पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. तर अलेक्झांडर हेंड्रिक्सने २८ व्या मिनिटाला आणखी एक पीसी रूपांतर करून २-० अशी आघाडी मिळवली.
दिलप्रीत सिंगने ३६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून फरक कमी केला. मनदीप सिंगने ३८ व्या मिनिटाला फील्ड गोल करून बरोबरी साधली. मात्र, चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये भारतीय बचावफळी कोसळली. कारण बेल्जियमकडून रोमन डुवेकोट, थिब्यू स्टॉकब्रोएक्स आणि व्हॅन डोरेनने गोल केले आणि आपल्या संघाला ५-२ अशी आघाडी मिळवून दिली. ५६ व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नवर गोल करून भारताकडून एक गोल केला.पण ५९ व्या मिनिटाला टॉम बूनने गोल करत बेल्जियमला ६-३ असा विजय मिळवून दिला.