संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

0

पुणे : दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजआणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीपुण्यातून मार्गस्थ झाली आहे. गेले दोन दिवसा पुणेकरांनी आणि आजूबाजूच्या भागातून आलेल्या भाविकांनी पालख्यांचं दर्शन घेतलं. यानंतर दोन्ही पालख्या आता पुण्याहून निघाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यातील विठोबा मंदिरातून सकाळी ६ वाजता मार्गस्थ झाली आहे. ज्ञानेश्वरांची पालखी आज दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे. दुसरीकडे तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर येथे असेल. तुकारामांची पालखी सकाळी साधारण ७ वाजता निवडुंगा विठ्ठल मंदिरातून मार्गस्थ झाली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने ७.३५ च्या दरम्यान रेस कोर्स पार केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech