इटली, रोम येथे झालेल्या दुसऱ्या “आंतरधर्मीय संवादावरील संसदीय परिषदेत” कुलगुरू डॉ. चिन्मय पंड्या यांनी केले प्रतिनिधित्व

0

मुंबई : कुलगुरू डॉ. चिन्मय पंड्या यांनी इटलीची राजधानी रोम येथे झालेल्या आंतरधार्मिक संवादावरील दुसऱ्या संसदीय परिषदेत भाग घेतला. ही जागतिक  इटालियन संसद, आंतर-संसदीय संघ आणि शांतीसाठी धर्म यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. कुलगुरू डॉ. चिन्मय पंड्या यांच्या युरोपमधील वास्तव्यादरम्यान,”श्रद्धेचे सशक्तीकरण आणि विश्वासाला बळकटी देणे आणि सामूहिक भविष्यासाठी आशा स्वीकारणे”  या विषयावर आधारीत संसदीय परिषदेत आयोजित करण्यात आली होती .

या प्रतिष्ठित प्रसंगी, कुलगुरू डॉ. चिन्मय पंड्या यांनी भारतातील एकमेव प्रतिनिधी वक्ते म्हणून हिंदू धर्माला संबोधित केले. १२० हून अधिक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसमोर, पंतप्रधानांसमोर, संसद सदस्यांसमोर, मंत्री आणि धार्मिक प्रतिनिधींसमोर सनातन धर्माच्या शाश्वत आणि सार्वत्रिक शिकवणी आणि दूरदर्शी परमपूज्य गुरुदेवांचा संदेश सादर करण्याचा हा त्यांच्यासाठी एक विशेष प्रसंग होता. या कार्यक्रमात त्यांनी  “शांतीसाठी शिक्षण” या विषयावरील त्यांच्या विचारांमध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीतील शिक्षणाचे खरे उद्दिष्ट, समजूतदारपणा, करुणा आणि आध्यात्मिक प्रतिष्ठेची स्थापनेचे महत्व प्रभावीपणे अधोरेखित केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech