वाहतूकमंत्री नितीन गडकरीच पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकले

0

पुणे : देशभरात प्रशस्त रस्त्यांचे जाळे विणणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरीच वाहतूक कोंडीमध्ये अडकले. नितीन गडकरी यांना आज पुण्याच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गडकरी यांची गाडी पुढे जात नसल्याचे बघून पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पण पुण्यातील वाहतूक कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे मंत्री नितीन गडकरी यांना आपला पाहणी दौरा रद्द करावा लागला. गडकरी यंनी गाडीत बसूनच अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

पुण्यातील शनिवार वाडा ते स्वारगेट या भुयारी मार्गासाठी भुयारी मार्ग व्हावा यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला होता. नितीन गडकरी हे शनिवार वाडा येथे पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. पण रस्त्यावर अचानक वाहतूक कोंडी झाली. लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे मंत्री गडकरी यांची गाडी वाहतूक कोंडीमध्ये अडकली. ट्रॅफिक जॅम जाल्यामुळे नितीन गडकरींनी पाहणी दौरा रद्द केलाय. नितीन गडकरी यांच्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील वाहतूक कोंडी राज्यात चर्चेत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech