शुभांशू शुक्ला उद्या घेणार अंतराळात भरारी

0

न्यूयॉर्क : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४ मिशन बुधवारी दुपारी उड्डाण करू शकते. याबाबतची माहिती अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दिली आहे. नासा, अ‍ॅक्सिओम स्पेस आणि स्पेसएक्सने चौथ्या मोहिमेचे प्रक्षेपण बुधवार२५ जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२:०१ वाजता करण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. हे मिशन फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथील कॉम्प्लेक्स ३९ए येथून प्रक्षेपित केले जाईल. अ‍ॅक्सिओम मिशन ४ आधी १९ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रक्षेपित केले जाणार होते. पण काही तांत्रिक त्रुटींमुळे हे मिशन अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले आहे. स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटवरून नवीन स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून क्रू मेंबर्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जातील. गुरुवार, २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ४:३० वाजता आयएसएससोबत डॉक करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. अ‍ॅक्सिओम-४ मोहीम भारतासाठी खूप महत्त्वाची आहे.कारण या मोहिमेअंतर्गत ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला भारतीय अंतराळवीर म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवास करतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech