ऍक्झिओम मिशन- ४ : शुभांशू शुक्ला सहकाऱ्यांसह अंतराळात झेपावले

0

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि इस्रोचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज, बुधवारी यशस्वीरित्या अवकाशात झेपावले. भारतीय वेळेनुसार आज दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी ऍक्सिओम मिशन ४ (ऍक्स-४) अंतर्गत स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने ड्रॅगन अंतराळयानासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (आयएसएस) उड्डाण केले. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे शुक्ला हे दुसरे भारतीय ठरले आहेत. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत त्यांचे हे मिशन अशस्वी ठरले आहे. ऍक्झिओम-४ मोहिमेत शुभांशू शुक्ला मिशन पायलट म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ऍक्सिओम-४ मोहिमेवर ५५० कोटी रुपये खर्च करत आहे.

त्यांच्यासोबत अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोज उज्नास्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे मिशन विशेषज्ञ म्हणून सहभागी झाले आहेत. ही मोहीम अ‍ॅक्सिओम स्पेस या खासगी कंपनीद्वारे आयोजित करण्यात आली आहे, जिचे उद्दिष्ट अंतराळ प्रवास सर्वांसाठी खुला करणे आहे. शुक्ला आणि त्यांचे सहकारी १४ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणार आहेत. या काळात ते अनेक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतील. इस्रोने खास शुक्ला यांच्यासाठी तयार केलेले सात प्रयोग ते करणार आहेत, ज्यामध्ये सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत मेथी आणि मुगाला अंकुरित करण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे. याशिवाय ते नासाच्या पाच संयुक्त अभ्यासांमध्येही सहभागी होतील. ऍक्सिओम मिशन- ४ वरील शुक्ला यांच्या अनुभवाचा इस्रोच्या गगनयान अंतराळ उड्डाण मोहिमेत खूप चांगला उपयोग केला जाईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech