नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय बनण्याच्या तयारीत असलेले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनाही मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे: “भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे आम्ही स्वागत करतो. भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. ते १.४ अब्ज भारतीयांच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा आपल्या बरोबर घेऊन जात आहेत. त्यांना आणि इतर अंतराळवीरांना या मोहिमेसाठी शुभेच्छा!