नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ प्रवासावर गेले आहेत. त्यांच्या यशस्वी मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे आम्ही स्वागत करतो. भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय बनण्याच्या मार्गावर आहेत. ते त्यांच्यासोबत १.४ अब्ज भारतीयांच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा घेऊन जात आहेत. त्यांना आणि इतर अंतराळवीरांना यशासाठी शुभेच्छा,” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभांशु शुक्लांना सोशल मीडियाच्या माध्यमातून या शुभेच्छा दिल्या आहेत. १९८४ नंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे शुभांशू हे पहिले भारतीय आहेत. ते इस्रोच्या गगनयान मोहिमेचा भाग आहेत. त्यांची अॅक्सिओम-०४ मोहिमेसाठी निवड झाली आहे.जी भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळवीरांना घेऊन प्रक्षेपित करण्यात आली आहे.