‘दृश्यम’ फेम अभिनेते कमलेश सावंत यांना पितृशोक

0

मुंबई : ‘दृश्यम’ सिनेमातून प्रेक्षकांचं मन जिंकलेले प्रसिद्ध अभिनेते कमलेश सावंत यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. कमलेश सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर करत भावुक पोस्ट करुन वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. कमलेश यांनी ही भावुक बातमी शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं सांत्वन करुन त्यांना धीर दिला आहे.

कमलेश सावंत यांनी सोशल मीडियावर वडिलांविषयीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन कमलेश सावंत लिहितात, ‘ते फक्त आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ नव्हते तर आज मी जो आहे त्याचा पाया माझ्या वडिलांनी रचला आहे. त्यांची मूल्ये, त्याची शांत असलेली ताकद आणि त्यांचे निःस्वार्थ प्रेम मला प्रत्येक पावलावर आठवत राहील’, अशा शब्दात कमलेश यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कमलेश यांच्या फिल्मी कारकीर्दीमध्ये त्यांच्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे. कमलेश यांच्या आयुष्याच्या चढ-उतारामध्ये त्यांच्या वडिलांची भक्कम साथ त्यांना मिळाली आहे. कमलेश यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, गेली अनेक वर्ष ते मराठी मालिका आणि सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. कमलेश यांना ‘दृश्यम’ सिनेमातील पोलीस अधिकारी गायतोंडेच्या भूमिकेमुळे अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ‘दृश्यम २’ मध्येही कमलेश झळकले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech