इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

0

तेहरान : इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आता इराणने देशाअंतर्गत कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. इराणने तीन जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. या तिघांवर इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादशी संबंध असल्याचा आरोप होता. तसेच ७०० जणांना अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इद्रिस अली, आझाद शोजाई आणि रसूल अहमद रसूल यांनी इस्रायलला सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तीनही आरोपींना आज(दि. २५) सकाळी तुर्किये देशाच्या सीमेजवळ असलेल्या उर्मिया शहरात फाशीची शिक्षा देण्यात आली.

फाशी दिलेल्या तीन लोकांनी इस्रायलच्या मोसादशी संबंध ठेवत एका अज्ञात व्यक्तीच्या हत्येसाठी हत्यारांची तस्करी केल्याचा आरोप ठेवला गेला आहे. दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यात १३ जून रोजी युद्ध सुरू झालं होतं.तब्बल १२ दिवसांच्या संघर्षानंतर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबला. यानंतर इराणनं इस्रायलशी संबंधित असलेल्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. माहितीनुसार, सर्वाधिक मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्यांमध्ये चीन नंतर इराणचा क्रमांक लागतो.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech