अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

0

वॉशिंगटन : हवाई दलाचे ग्रूप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि त्यांची अ‍ॅक्सिओम-४ टीम गुरुवारी (दि.२६ जून) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली. २८ तासांच्या प्रवासानंतर हे सर्व जण आयएसएसमध्ये पोहोचले आहेत.सायंकाळी साधारणपणे ६ वाजण्याच्या सुमारास, अंतराळ स्थानकाचे हॅच उघडल्यानंतर, शुभांशूंसह सर्व अंतराळवीर आयएसएसमध्ये दाखल झाले. यावेळी, आयएसएसमधील टीमने त्यांचे उत्साहाने स्वागत केले.यावेळी शुभांशू शुक्ला यांनी हिंदीतून देशवासीयांना संदेश दिला.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या स्वागत समारंभात हिंदीतून देशवासीयांना संदेश दिला. ते म्हणाले, “तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी अगदी सुरक्षितपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलो. येथे उभे राहणे फार सोपे दिसत आहे, मात्र ते थोडे कठीण आहे. डोके काहीसे जड आहे, थोडी अस्वस्थता आहे, मात्र या फार लहान गोष्टी आहेत. काही दिवसांत याची सवय होईल. मग अशा समस्या येणार नाहीत. या प्रवासाचा हा पहिला थांबा आहे. आता पुढील १४ दिवस येथे राहून आम्ही बरेच प्रयोग करणार आहोत आणि तुमच्या सोबतही संवाद साधू.” शुक्ला पुढे म्हणाले, “या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी अत्यंत उत्सुक होतो. आपणही माझ्या एवढेच उत्सूक असाल. मला खात्री आहे की, पुढील १४ दिवस अत्यंत अद्भूत असतील. कारण आपण अनेक रिसर्च करणार आहोत. जय हिंद जय भारत…

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech