हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक : भारत आणि पाकिस्तान एकाच गटात

0

बर्न : तामिळनाडू येथे होणाऱ्या २०२५ च्या एफआयएचपुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. स्वित्झर्लंडमधील आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या मुख्यालयात झालेल्या ड्रॉमध्ये चिली आणि स्वित्झर्लंडसह पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानला गट ‘ब’ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. दोन वेळा विजेता असलेल्या भारताने नऊ वर्षांपूर्वी लखनौमध्ये अखेरचे विजेतेपद पटकावले होते. अलिकडच्या काळात भारताला सलग उपांत्य फेरी गाठता आली आहे. पण विजेतेपदावर आपलं नाव कोरता आलेलं नाही. दुसरीकडेपाकिस्तानने १९७९ मध्ये जेव्हा ही स्पर्धा पहिल्यांदा आयोजित केली होती त्यावेळी त्यांनी या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं. पण पाकिस्तानला १९९३ पासून उपांत्य फेरीतपर्यंत पोहचण्यात यश आलेलं नाही. ज्युनियर हॉकी विश्वचषकाची स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे खेळवली जाणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech