सोलापूर : श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यामध्ये शनिवार २८ जून रोजी आगमन झाले असून सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदीप जंगम यांनी स्वागत केले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव हद्दीत संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कुमार, कासेगाव सरपंच यशपाल वारकर, उळे गाव सरपंच अंबिका कोळे उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वारकऱ्यांना आरोग्य किट देऊन पालखीचे स्वागत केले.दरम्यान रविवारी सकाळी ९ वाजता शहरातील रूपाभवानी चौकात पालखीचे आगमन होणार असून रविवारी कुचन प्रशाला येथे गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.