वेस्ट इंडिजच्या प्रशिक्षकांवर दंडात्मक कारवाई

0

दुबई : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांना तिसरे पंच एड्रियन होल्डस्टॉक यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल आयसीसीने दंड ठोठावला आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सॅमीने दोन वादग्रस्त निर्णयांवर चिंता व्यक्त केली होती. आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल सॅमीला त्याच्या सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. बार्बाडोसमध्ये दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १५९ धावांनी पराभव केला.

या सामन्यात पंचांच्या निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसपासून ते मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीपर्यंत सर्वांनी पंचांवर टीका केली. चेसने पंचांवर कारवाईची मागणीही केली होती. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार सॅमीने संहितेच्या कलम २.७ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. जे आंतरराष्ट्रीय सामन्याबाबत किंवा क्रिकेटपटूबाबत, क्रिकेट सपोर्ट स्टाफ, सामना अधिकारी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभागी होणाऱ्या संघाशी संबंधित कार्यक्रमाबाबत सार्वजनिक टीका किंवा अनुचित टिप्पण्या करण्याशी संबंधित आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech