हैदराबाद : तेलंगणातील पसुम्यालाराम येथील सिगाची इंडस्ट्रीज फार्मा प्लांटमध्ये सोमवारी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटातील मृतकांची संख्या ३४ झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी दिली. आतापर्यंत ढिगाऱ्यातून ३१ मृतदेह बाहेर काढले असून उपचारादरम्यान ३ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. ही कंपनी सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीएलएस), इंटरमीडिएट्स, एक्सिपियंट्स, व्हिटॅमिन-मिनरल ब्लेंड्स आणि ऑपरेशन्स अँड मॅनेजमेंट सेवांमध्ये कार्यरत आहे. या केमिकल कंपनीत सोमवारी भीषण स्फोट झाला होता. रासायनिक अभिक्रियेमुळे ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.