केरळमध्ये अडकलेले लढाऊ विमान एफ-३५ बी २० दिवसांनंतरही नादुरुस्त

0

तिरुवनंतपुरम : ब्रिटिश रॉयल नेव्हीचे एफ-३५ हे लढाऊ विमान अजूनही केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे आहे. अनेक दुरुस्ती करूनही विमान उडण्याच्या स्थितीत नाही. ब्रिटनमधील अभियंत्यांची एक टीम ते दुरुस्त करण्यासाठी आली होती. पण आतापर्यंत दुरुस्ती यशस्वी झालेली नाही. त्यामुळे आता हे लढाऊ विमान लष्करी मालवाहू विमानाद्वारे तुकड्यांमध्ये ब्रिटनला परत नेण्यात येणार आहे. १४ जूनच्या रात्री केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर या लढाऊ विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. लँडिंगनंतर जेटमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. ज्यामुळे ते परत जाऊ शकले नाही. हे जेट १३ दिवसांपासून विमानतळावर उभे आहे.

९१८ कोटी रुपये किमतीचे हे विमान ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा भाग आहे. हे जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. एचएमएस तज्ञांनी सांगितले होते की, जेट दुरुस्त करण्यासाठी ब्रिटिश अभियांत्रिकी पथकाची मदत घ्यावी लागेल. रॉयल नेव्हीचे विमान केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे १०० नॉटिकल मैल अंतरावर उड्डाण करत होते. तेव्हा त्यांनी आणीबाणीची घोषणा केली. भारताच्या एकात्मिक हवाई कमांड आणि नियंत्रण प्रणालीने त्यांना उतरण्याची परवानगी दिली. भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, जेट विमान भारताच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्राबाहेर उड्डाण करत होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech