भरगच्च सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष हेमलता नरेंद्र पवार यांचा वाढदिवस
रक्तदान शिबिर, डोळे तपासणी, संगणक प्रशिक्षण, महिला आरोग्य तपासणीसह करण्यात आली वृक्ष लागवड
कल्याण : विविध सामाजिक उपक्रम राबवत भाजप जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ज्यामध्ये रक्तदान शिबिर, डोळे तपासणी, महिलांसाठी संगणक प्रशिक्षण, महिला आरोग्य तपासणीसह वृक्ष लागवड करत सामाजिक संवेदना जपल्याचे दिसून आले. हेमलता नरेंद्र पवार म्हटलं की कल्याण शहरात सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या संवेदनशील महिला सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. आणि आपल्या या सामजिक ओळखीला साजेसे अनेक उपक्रम राबवून त्यांचा आजचा वाढदिवस हा साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम हेमलता नरेंद्र पवार यांनी पारनाका येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत आपल्या दिवसाची सुरूवात केली. इतकेच नाहीतर स्वामींच्या दर्शनानंतर त्याठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले.
त्यानंतर पारनाका येथील राजस्थान हॉलमध्ये आयोजित सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमूख उपस्थितीत सहभागी झाल्या. याठिकाणी सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना हेमलता पवार आणि नरेंद्र पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तिन्ही सामाजिक उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, मनिषा केळकर, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस प्रीती दीक्षित, जुने कल्याण मंडल सरचिटणीस विवेक वाणी, नवीन कल्याण मंडल महिला मोर्चा अध्यक्षा भावना मनराजा, उपाध्यक्ष विनोद मुथा, जुने कल्याण महिला मोर्चा सरचिटणीस अँड. अर्चना सबनीस, संध्या निकुंभ, सारिका शाह, जमशेद खान, समृद्धी देशपांडे, सुधीर जोशी, रवी गुप्ता, सदा कोकणे, प्रणव महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्यामध्ये उमादेवी सीताराम बैरागी हॉस्पिटल आणि फर्टिलीटी रिसर्च सेंटरच्या सहकार्याने स्त्री रोग तज्ञांकडून महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यानंतर अनिल आय हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी, निकॅड कॉम्प्युटर अकादमीच्या माध्यमातून १०० महिलांसाठी १ महिना मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नोंदणीचेही आयोजन करण्यात आले होते. इतकेच नाही तर सध्या रुग्णालयांना असणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जुने कल्याण मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिराचेही याठिकाणी आयोजन केले होते. या सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये कल्याण पश्चिमेतील शेकडो महिला, तरुणी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तर वाढदिवसानिमित हेमलता नरेंद्र पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी राजस्थान हॉलमध्ये भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.