पाक हॉकी संघाला भारतात खेळू देणे ही लज्जास्पद गोष्ट ! – आदित्य ठाकरे

0

मुंबई : पाक हॉकी संघाला भारतात खेळू देणे ही लज्जास्पद गोष्ट आहे, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ४ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली. पाकिस्तानी हॉकी संघाला भारतात खेळण्याची अनुमती दिल्याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, पहलगाम आक्रमणातील आतंकवादी अद्याप पकडले गेले नाहीत. त्या आक्रमणाच्या जखमा अद्याप बर्‍या झालेल्या नाहीत; पण त्यानंतरही केंद्र सरकारने यंदा भारतात होणार्‍या हॉकी आशिया कपमध्ये पाकिस्तानला खेळण्यास अनुमती दिली आहे. त्यानंतर बीसीसीआय आपला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट आशिया कपमध्ये खेळवेल. पाकिस्तानकडून आतंकवादाविरुद्ध निर्णायक कारवाई होईपर्यंत आपण विज्ञापनांमधून मिळणार्‍या उत्पन्नाचा मोह रोखू शकतो का ? आतंकवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत अशा घटनांमधून पाकिस्तानला लाभ होऊ देणार नाही याविषयी केंद्र सरकार ठाम राहू शकत नाही का ? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech