मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे- अरविंद केजरीवाल

0

चंदीगड : “जोपर्यंत दिल्लीत आमचे सरकार होते, तोपर्यंत आम्हाला काम करण्याची परवानगी नव्हती, तरीही आम्ही काम केले.मला वाटते की, मला यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, असे विधान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. केजरीवाल यांनी बुधवारी (दि.९) पंजाबमधील मोहाली येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान हे विधान केले.यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाचे अनेक नेते देखील उपस्थित होते.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही उपराज्यपालांच्या अडथळ्यांना न जुमानता, दिल्लीत खूप काम केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आम्ही इतक्या अडचणींमध्ये दिल्लीत मोहल्ला क्लिनिक बांधले. भाजपच्या महानगरपालिकेने बुलडोझर पाठवून पाच मोहल्ला क्लिनिक पाडले. गेल्या वर्षी जूनमध्ये, जेव्हा तापमान ५० अंश सेल्सिअस होते, तेव्हा एक मिनिटही वीजपुरवठा खंडित झाला नव्हता, परंतु आता वीजपुरवठा खंडित होत आहे. भाजपने दिल्ली उद्ध्वस्त केली. ते राजकारण करत आहेत, त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत. आप सरकारने एलजीच्या अडथळ्यांना न जुमानता इतके काम केले. मला दिल्लीत सरकार चालवल्याबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी इच्छा केजरीवालांनी व्यक्त केली.

यापूर्वीही केजरीवाल यांनी म्हटले होते की, ते नोबेल पुरस्कारास पात्र आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी म्हटले होते की, दिल्ली सरकारच्या कामात एलजी अडथळे निर्माण करतात, तरीही मी इतके काम केले आहे की, मला नोबेल पारितोषिक मिळावे. केजरीवाल यांचं हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कारासाठी प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान सरकार आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही त्यांना त्यासाठी नामांकित केले आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech