चला हवा येऊ द्या – कॉमेडीचा गँगवॉर

0

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे नव्या आणि दमदार रुपात. कॉमेडीचं गँगवॉर! आता प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे हास्याचा एक भन्नाट महोत्सव जिथे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट विनोदवीर आपले विनोदी कौशल्य सादर करतील. यंदा च्या कार्यक्रमात असणार आहेत धमाकेदार स्किट्स, गँगलॉर्ड्समध्ये रंगलेली बोलीची स्पर्धा, खास सेलिब्रिटींची हजेरी, आणि उत्साही प्रेक्षकांच्या सहभागासह एक हटके मनोरंजन!

या पर्वात पुन्हा एकदा सज्ज आहेत प्रेक्षकांचे लाडके कलाकार श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे आणि ह्यांच्यासोबत यंदा मंचावर उतरतील दमदार हास्यकलाकार गौरव मोरे आणि अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव. हे सगळे आता गँगलॉर्ड्सच्या भूमिकेतून नव्या कलाकारांना मार्गदर्शन करतील त्यांना प्रशिक्षित करतील आणि एक धमाकेदार विनोदी टीम तयार करतील. ह्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहेत अभिजीत खांडकेकर. त्याच्या उत्साही शैलीमुळे प्रत्येक भाग अधिक रंगतदार आणि मनोरंजक ठरणार आहे. प्रत्येक भागात गँगलॉर्ड्स म्हणजेच पाच मेंटॉर्सचे एक विशेष विनोदी सादरीकरण करतील ज्याने प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. त्यासोबतच महाष्ट्रभरातून आलेले २५ विनोदी कलाकार महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा विडा हाती घेणार आहेत.

ह्या पर्वाच्या लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे योगेश शिरसाट ह्यांनी त्यासोबतच नव्या दमाचे होतकरू लेखक अनिश गोरेगावकर, अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, अक्षय जोशी, पूर्णानंद वांढेकर आणि अमोल पाटील ह्यांनी. “चला हवा येऊ द्या” ‘कॉमेडीचे गँगवॉर’ हा कार्यक्रम नवा ताजेपणा देणारा आणि नव्या पिढीच्या विनोदी कलाकारांना मोठं व्यासपीठ देणारा एक अनोखा प्रयोग आहे. चला हवा येऊ द्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरात विनोदाची नवी लाट घेऊन येणार आहे, तेव्हा सज्ज व्हा कारण कॉमेडीचे गॅंगलॉर्ड्स येत आहेत २६ जुलै पासून शनी – रवि रात्री ९ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech