वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू

0

वडोदरा : वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला आहे. बेपत्ता तीन जणांचा शोध घेण्यासाठी अजूनही बचाव कार्य सुरू आहे. नदीत आणखी दोन वाहने अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना बुधवारी सकाळी घडली होती. अपघातात धडकलेल्या आणि नदीत पडण्याच्या बेतात असलेल्या इतर दोन वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. काल रात्री उशिरापर्यंत मदत आणि बचाव कार्य सुरू होते. नदीत माती आणि सिरेमिक टाइल्सने भरलेला ट्रक काढून टाकण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी सातत्याने उपस्थित आहेत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवत आहेत. रात्री उशिरा फ्लड लाईट बसवूनही शोध कार्य करण्यात आले. दरम्यान तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पद्रा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech