मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या युवकांना ५१,००० हून अधिक नियुक्ती पत्रे वितरित करणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. रोजगार मेळावा, हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. यामुळे तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी तसेच राष्ट्रीय विकासात प्रभावीपणे योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध होतील. देशभरातील रोजगार मेळ्यांमधून आतापर्यंत १० लाखांहून अधिक नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेला अनुसरून देशभरातील ४७ ठिकाणी १६ वा रोजगार मेळा आयोजित केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांमध्ये ही भर्ती होत आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, टपाल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, कामगार आणि रोजगार मंत्रालय यासह इतर विभाग आणि मंत्रालयांमध्ये रुजू होतील.