रथयात्रेवर अंडी फेकल्याचा भारताकडून निषेध

0

ओटावा : कॅनडातील टोरंटो शहरात झालेल्या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान काही अज्ञात लोकांनी भाविकांवर अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.रस्त्यावर भजन गात भाविक रथयात्रेत सहभागी होत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, भारत सरकारने कॅनडाकडे तीव्र निषेध नोंदवला आहे आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेला ‘घृणास्पद आणि निंदनीय’ म्हटले आहे. ते म्हणाले, ‘टोरंटोमध्ये आयोजित रथयात्रेदरम्यान काही गैरकृत्यांनी व्यत्यय आणला, जो उत्सवाच्या भावनेविरुद्ध आहे. आम्ही कॅनेडियन अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे आणि दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा करतो.’

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि ट्विटरवर लिहिले की, ‘ही घटना जगभरातील भाविकांच्या भावना दुखावतेच, पण ओडिशाच्या लोकांसाठीही अत्यंत वेदनादायक आहे.’ भारतीय समुदाय आणि अनिवासी भारतीयांनीही या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे आणि कॅनेडियन सरकारकडून त्वरित आणि ठोस कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, ही घटना एका भारतीय-कॅनेडियन महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर उघडकीस आली, ज्यामध्ये तिने आरोप केला होता की जेव्हा ती आणि इतर भाविक टोरंटोमध्ये रथयात्रेत सहभागी होत होते, तेव्हा जवळच्या इमारतीतील कोणीतरी त्यांच्यावर अंडी फेकली

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech