शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्न पहा, यश सदैव तुमचंच आहे – रोहन घुगे

0

मुरबाड : प्रफुल्ल शेवाळे

प्रियजन गुण गौरव समिती मुरबाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुरबाड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावर्षी दहावी आणि बारावी च्या परीक्षेमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी वर्गाचा सत्कार समारंभ मुरबाड येथील MIDC हॉल येथे पार पडला. यावेळी सदर कार्यक्रम करिता मुख्य अतिथी म्हणून ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करीत असताना रोहन घुगे म्हणाले की, मी सुद्धा तुमच्या मधला च एक सामान्य विद्यार्थी म्हणून वावरलो आहे. आपल्या आगामी आयुष्याकरिता शिक्षणाचे एक ध्येय निश्चित करा. शिक्षणाच्या माध्यमातून खरोखर मोठी स्वप्न पहा, दूरदृष्टी ठेवा आणि यातून भव्य दिव्य यश नक्कीच तुमच्या पदरात पडल्या शिवाय राहणार नाही. डॉ. अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या व्यक्ती आज सुद्धा तुम्हाला आम्हाला पुस्तकामधून भेटत आहेत. विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो स्वतः ला ओळखा आणि शिक्षणाच्या भव्य दिव्य वाटेवर चालत राहा असा मोलाचा सल्ला श्री. घुगे यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करीत म्हटलं की, पुढारी कमी व्हा, अधिकारी जास्त व्हा.. आपल्या देशात शिक्षणाचे दालन खूप मोठं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. याचं धर्तीवर शिक्षणाचे मोल ओळखा आणि पुढे चालत राहा. आपल्यामधील विदयार्थी वर्गाला पुढे उच्चं शिक्षण, उच्चं पदस्थ अधिकारी होण्यासाठी पाहिजे ती मदत करण्याचा आमचा मानस असणार आहे.

यावेळी उपस्थित एका विद्यार्थीनी ने आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की हा आजचा आमचा सन्मान, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह हे सारं काही उद्याची आमची जबाबदारी वाढवणारे, आयुष्याची उंची वाढवणारे एक आधारस्तंभ आहे. या सोहळ्याचे मुख्य अतिथी मा.श्री.रोहन घुगे (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे तर अध्यक्षस्थानी मा. श्री. प्रमोद हिंदुराव (उपाध्यक्ष, रा. कॉ. पार्टी, महाराष्ट्र राज्य) होते.

यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.भरत भाऊ गोंधळे, प्रदेश सचिव रविंद्र परटोले, युवक जिल्हाध्यक्ष प्रतिक हिंदुराव, महिला जिल्हाध्यक्ष सौ.कल्पनाताई तारमळे, मीडिया सेल जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेवाळे, मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकात बोष्टे, कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर, अरुण जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech