एअर इंडियाकडून बोईंग विमानांच्या इंधन नियंत्रण स्विचची तपासणी पूर्ण

0

नवी दिल्ली : अहमदाबादमधील भीषण अपघातानंतर एअर इंडियाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७-बोईंग ७३७ विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचची तपासणी पूर्ण झाली आहे. आणि यामध्ये कोणतीही कमतरता आढळली नाही. १४ जुलै २०२५ रोजी डीजीसीएच्या निर्देशांनुसार ही तपासणी वेळेवर पूर्ण झाली. या तपासणीत कोणताही दोष आढळला नाही. एअर इंडियाने मंगळवारी सांगितले की, त्यांनी त्यांच्या संपूर्ण बोईंग ७८७ आणि बोईंग ७३७ विमानांच्या फ्लीटवरील इंधन नियंत्रण स्विच म्हणजेच एफसीएस लॉकिंग यंत्रणेची सावधगिरीची तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि कोणताही दोष आढळला नाही. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकसाठी उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ विमान एका इमारतीवर कोसळल्यानंतर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. या अपघातात २६० नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये विमानातील २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा समावेश होता.

१२ जुलै रोजीइंडियन एअरलाइन्सने खबरदारी म्हणून स्वतःहून बोईंग फ्लीटच्या इंधन प्रणालीची तपासणी सुरू केली. एअर इंडियाने ही माहिती डीजीसीएला दिली आहे. आणि प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षेसाठी ते पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. एअर इंडिया फ्लाइट १७१ च्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला आहे. ज्यामध्ये इंधन स्विच बंद करण्याबाबत दोन्ही वैमानिकांमधील संभाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech