नवी दिल्ली : मुख्यमंत्री क्रीडा प्रोत्साहन योजनेअंतर्गत दिल्ली सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिकमधील विजेत्यांना मिळणाऱ्या रोख बक्षिसात सरकारने वाढ केल्याची माहिती दिल्लीचे मंत्री आशिष सूद यांनी दिली आहे. यासंदर्भात आशिष सूद म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला ७ कोटी रुपये, रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूला ५ कोटी रुपये आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूला ३ कोटी रुपये दिले जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकणाऱ्यांना गट ‘अ’ मध्ये नोकरी दिली जाणार आहे. तर कांस्य पदक विजेत्यांना गट ‘ब’ मध्ये नोकरी दिली जाईल.पूर्वी दिल्ली सरकार ऑलिम्पिक आणि पॅरालिंपिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना तीन कोटी, दोन कोटी आणि एक कोटी रुपये देत होती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली प्रोत्साहन रक्कम वाढवण्यात आली आहे. आतापर्यंतहरियाणा सरकार बक्षीस रक्कम देण्यात आघाडीवर होते. सुवर्णपदक विजेत्याला ६ कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला ४ कोटी रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला २.५ कोटी रुपये दिले जात आहेत.