७१ व्या राष्ट्रीय चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा
राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, शाहरुख खान, विक्रांत मेसी सर्वोत्कृष्ट अभिनेते
नवी दिल्ली : भारतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज, शुक्रवारी करण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये राणी मुखर्जीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर शाहरुख खान आणि विक्रांत मेसीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. याशिवाय ’12वी फेल’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. तर मराठीमध्ये श्यामची आईला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली.
विविध श्रेणी आणि पुरस्कारार्थी सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा – श्यामची आई, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी, सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल, सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा – नाळ 2, सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- कथल, सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री – गॉड वल्चर अँड ह्युमन, सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म – टाइमलेस तमिळनाडू,सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म – भगवंत केसरी, सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- पार्किंग, सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म – गॉडडे गॉडडे चा, सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा – वश, सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा – डीप फ्रीजर, सर्वोत्कृष्ट ॲक्शन सिनेमा – हनूमान, सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी – वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी), सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक – हर्षवर्धन रामेश्वर (ॲनिमल सिनेमा), सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन – ॲनिमल, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी, सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल- शिल्पा राव, सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार- कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकले आणि भार्गव, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- उर्वशी, जानकी बोडीवाला, सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई या सिनेमात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये, मयुर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
आचार्य अत्रे यांनी १९५३ साली ‘श्यामची आई’ हा चित्रपट केलेला, त्यानंतर २०२३ साली साने गुरुजी यांच्या १९३३ सालच्या त्याच नावाच्या साहित्यकृतीवर बेतलेला नवा ‘श्यामची आई’ हा सिनेमा रीलिज झाला होता. कृष्ण-धवल काळात घेऊन जाणारा हा सिनेमा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. दिग्दर्शक सुजय डहाकेच्या या कलाकृतीचे विशेष कौतुकदेखील झाले होते. दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या या सिनेमाने आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरले आहे.