मुंबई : स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय.नुकतंच प्राजक्ताने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्राजक्ताने तीच लग्न ठरलं असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत हि आनंदाची बातमी तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये प्राजक्ताने गळ्यात भलामोठा हार, दागिने घातलेलं दिसून येत आहे. कपाळावर कुंकू , आजूबाजूला असलेले पाहुणे सगळंकाही या फोटो मध्ये दिसून येत आहे. याचसोबत “प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा कोण हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
अभिनेत्रीने याविषयी अद्याप खुलासा केला नाहीये. त्यामुळे प्राजक्ताचा होणारा नवरा कोण याची उत्सुकता शिगेला आहे. प्राजक्ताने लग्नाचा खुलासा केल्याने ती होणाऱ्या नवऱ्याबद्दलही लवकरच सांगेल, अशी शक्यता आहे. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ‘आई माझी काळूबाई’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ अशा मालिकांमध्ये तिने अभिनय केला. प्राजक्ताच्या नवीन प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.