मुंबई : सध्याच्या ट्रेंडनुसार फॅशन आणि ग्लॅमर यांचे मिश्रण दाखवणाऱ्या अभिनेत्री अश्विनी चवरेच्या अलीकडील फोटोशूटने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. साऊथ सिनेविश्वात आपल्या अभिनयाने वेड करणाऱ्या या अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीमध्येही छाप पाडली. मराठी आणि साऊथचं दमदार कोलॅबोरेशन असलेली ही अभिनेत्री ‘जिलबी’, ‘मी पाठीशी आहे’ या सिनेमांत दिसली. या सिनेमांमुळे अश्विनीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा अश्विनीचा आगामी चित्रपट आहे. अभिनयाबरोबरच अश्विनी नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली आहे. याशिवाय अनेक मराठी अल्बमसाठीही तिने काम केलं आहे.
२०२५ हे वर्ष अश्विनीसाठी खूप खास आहे. कारण या वर्षात अश्विनीची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली, नेहमीच अभिनय व जोडीस फोटोशूटने आठवणीत राहणाऱ्या या अभिनेत्रीच्या आता आणखी एका फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हो. अश्विनीने पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये हे खास फोटोशूट केलं आहे. या ड्रेसबरोबरच अभिनेत्रीचे कुरळे मोकळे सोडलेले केस आणि त्यात अडकवलेली पांढरी फुलं तिच्या लूकमध्ये भर घालत आहेत. इतकंच नाही तर या खास लूकसाठी वापरलेल्या अश्विनीच्या हातातील नाजूक अशा मोत्याच्या ब्रेसलेटची अधिक चर्चा झाली.
सध्या अश्विनीच्या मादक, मनमोहक पोज देत काढलेल्या या फोटोशूटने हवा केली आहे. या फोटोशूटमधून अश्विनीची निरागसता अधिक भावली. शिवाय या फोटोशूटमध्ये अश्विनीचा आत्मविश्वास, शैली आणि सौंदर्य यांची उत्तम छटा अनुभवायला मिळत आहे. कॅमेऱ्यात कैद झालेले हे खास फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरुन प्रतिक्रिया मिळत आहेत. या फोटोंमुळे चर्चेत आलेली अश्विनी आता आगामी कोणत्या चित्रपटांमध्ये दिसणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.