रेडियम पट्ट्यांमुळे भटक्या जनावरांना ‘सुरक्षाकवच’

0

पालघर : मुंबई–अहमदाबाद महामार्ग आणि डहाणू–जव्हार राज्य मार्गावर रात्रीच्या वेळी भटक्या जनावरांच्या अपघातांत वाढ होत आहे. अंधारात वाहनचालकांना जनावरे दिसत नसल्याने अनेकदा त्यांना धडक बसून जनावरे जखमी होतात, तसेच चालकांनाही इजा होते. या पार्श्वभूमीवर कासा–चारोटी येथील गो सेवा मित्रमंडळाने जनावरांच्या गळ्यात रेडियम पट्ट्या बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. रात्री वाहनांच्या प्रकाशात हे पट्टे चमकतात, त्यामुळे जनावरे लांबूनच चालकांच्या नजरेस पडतात आणि अपघात टाळता येतात. मंडळाचे कार्यकर्ते जखमी जनावरांच्या उपचारांची जबाबदारीही स्वीकारतात. पावसाळ्यात चारा खाऊन झाल्यानंतर ही जनावरे रस्त्यावर बसतात, त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. रेडियम पट्ट्यांमुळे मात्र जनावरांचे प्राण वाचण्याबरोबरच वाहनचालकांचीही सुरक्षितता वाढणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech