एसआयआरबाबत विरोधकांकडून कोणताही आक्षेप नाही – निवडणूक आयोग

0

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आज, सोमवारी विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) संदर्भात दैनिक बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. या बुलेटिननुसार, बिहारमध्ये १ ते १८ ऑगस्ट दरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेअंतर्गत १ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर १८ दिवसांच्या कालावधीत कोणत्याही पक्षाकडून दावा किंवा हरकत दाखल झालेली नाही. दावे व हरकती सादर करण्यासाठी आता केवळ १४ दिवसांचा कालावधी उरलेला आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, गेल्या १८ दिवसांत पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी व अपात्र मतदारांची नावे वगळण्यासाठी ४५ हजार ६१६ अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यापैकी ७ दिवसांनंतर १३४८ अर्जांचे निपटारे करण्यात आले आहे. तसेच, १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नवमतदारांकडून १ लाख ५२ हजार ६५१ फॉर्म ६ (घोषणेसह) प्राप्त झाले असून, त्यात बीएलएकडून प्राप्त ६ फॉर्म्सचा समावेश आहे. बिहारमध्ये एकूण १ लाख ६० हजार ८१३ बूथ लेव्हल एजंट्स (बीएलए) कार्यरत आहेत. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाने नेमलेल्या बीएलएंकडून फॉर्म ६ (दावा) किंवा फॉर्म ७ (हरकत) सादर करण्यात आलेले नाहीत. आयोगाने असेही नमूद केले की, नियमानुसार पात्रता दस्तावेजांची तपासणी होईपर्यंत कोणत्याही दावे अथवा हरकतींचे निपटारे सात दिवसांपूर्वी करता येत नाही.

शेष संक्षिप्त सुधारणा आदेशांनुसार, १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा यादीमधून कोणत्याही मतदाराचे नाव तपासणी व योग्य सुनावणीशिवाय आणि स्पष्ट आदेशांशिवाय काढून टाकता येणार नाही. मसुदा मतदार यादीमध्ये समाविष्ट नसलेल्या हटवलेल्या मतदारांची यादी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर EPIC Search Mode मध्ये उपलब्ध आहे. प्रभावित नागरिक आपले दावे सादर करताना आधार कार्डाची प्रत जोडू शकतात.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech