ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, बावनकुळे अध्यक्ष

0

मुंबई : इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत, तसेच इतर संलग्न बाबींवरील करावयाच्या कार्यवाहीबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यासोबत मंत्रिमंडळातील अन्य सात मंत्री आणि उपसमितीचे सचिव म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव असणार आहेत. ओबीसी समाजच्या विविध बाबींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार ही उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज, बुधवारी जारी करण्यात आला आहे.

उपसमितीत सदस्य म्हणून मंत्री छगन भुजबळ (अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण), मंत्री गणेश नाईक (वने), मंत्री गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता), मंत्री संजय राठोड (मृदा व जलसंधारण), मंत्री पंकजा मुंडे (पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन), मंत्री अतुल सावे (इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा आणि दिव्यांग कल्याण), मंत्री दत्तात्रय भरणे (कृषी) यांचा समावेश आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech