नवी दिल्ली : आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हा सामना आहे, तो होऊ द्या. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाकडून लवकर सुनावणीची मागणी केली होती. न्यायालयाने म्हटले होते की, सामना रविवारी आहे, त्यामुळे शुक्रवारीच सुनावणी झाली पाहिजे. न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, घाई काय आहे? हा सामना आहे, तो होऊ द्या. सामना या रविवारी आहे.
याचिकाकर्त्यांचा वकिलांनी सांगितले की, माझा खटला चुकीचा असू शकतो. पण तो सुनावणीसाठी सूचीबद्ध केला पाहिजे. पण सर्वोच्च न्यायालयाने याचिका त्वरित सूचीबद्ध करण्यास नकार दिला. परदेशात होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे याचिका दाखल करण्यात आली आहे. उर्वशी जैन यांनी न्यायालयाला या संदर्भात भारत सरकारला योग्य निर्देश देण्याची विनंती केली आहे. याचिकाकर्त्यांचे वकील स्नेहा राणी आणि अभिषेक वर्मा यांच्या मते सर्वोच्च न्यायालयाला भारत-पाकिस्तान आशिया कप टी-२० सामना रद्द करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
घटनेच्या कलम ३२ अंतर्गत दाखल केलेल्या या जनहित याचिकेत उर्वशी जैनसह चार कायद्याच्या विद्यार्थिनींनी आशिया कप टी-२० लीगचा भाग म्हणून १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई येथे होणारा भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना रद्द करण्याचे निर्देश तात्काळ देण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ च्या अंमलबजावणीसाठी निर्देश देण्याचीही मागणी केली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर, ज्यामध्ये भारतीय नागरिक आणि सैनिकांनी आपले प्राण गमावले. त्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना आयोजित करणे राष्ट्रीय प्रतिष्ठेशी आणि जनभावनेशी विसंगत संदेश पाठवते. असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, दहशतवादाला आश्रय देणाऱ्या राष्ट्रासोबत खेळांमध्ये भाग घेतल्याने सशस्त्र दलांचे मनोबल कमकुवत होते. आणि शहीद आणि दहशतवादाच्या बळींच्या कुटुंबीयांना त्रास होतो. याचिकाकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की, क्रिकेटला राष्ट्रीय हित, देशातील जनतेचे जीवन आणि सैन्याची निष्ठा आणि बलिदान यापेक्षा वर ठेवता येणार नाही.
आशिया कपमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. काही देशवासीय आगामी सामन्याबद्दल खूश नाहीत. त्यामुळेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कायद्याच्या विद्यार्थिनी उर्वशी जैन आणि इतर तीन विद्यार्थ्यांनी संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील स्नेहा राणी आणि अभिषेक वर्मा यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, हा सामना रद्द करण्यासाठी भारत सरकारला योग्य निर्देश द्यावेत.