टोमॅटोच्या भावात मोठी घसरण

0

नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील कृउबा समितीत यावर्षीचा टोमॅटो हंगाम निम्यावर आला आहे. गत महिन्यात याच टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला ७५० रुपये दर होते. मात्र, गणेशोत्सवात गुवाहाटी व बांगलादेश सीमा बंद करण्यात आल्या होत्या. सात दिवसात टोमॅटोची दरात मोठी घसरण झाली आहे. हाच टोमेटो आता सरासरी १५० रुपये क्रेटवर आल्याने टोमॅटोच्या दरात ६०० रुपयांची घसरण झाल्याने टोमेटो उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण असून, किरकोळ बाजारात तो १० रुपये किलोवर आला आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून, एका आठवड्यात चांगली आवक उपलब्ध झाली. बुधवारी (दि.१०) ला २,२९,८४० क्रेट आवक टोमॅटो विक्रीस आले होते. आणि त्या वेळेपासूनच टोमॅटोचे दर कोसळू लागले आहेत. मागील महिन्यापेक्षा टोमॅटो दरात सुमारे ६०० रुपयांची घसरण झाली असून, २० किलोच्या कॅरेटला १० रुपये दर झाल्याने शेतकऱ्यांचा टोमॅटोचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. या टोमॅटोला सरसरी १५१ रुपये दर मिळाला.

पिंपळगाव बाजार समितीत दिंडोरी तालुक्यातील करंजगाव, ओझरखेड तर येवला तालुक्यातूनही मोठी आवक होत आहे. मागील आठवड्यात गणपती उत्सव सुरू असल्याने सिलिगुडी, गुवाहाटी व बांगलादेश सीमा बंद करण्यात आल्या होत्या, मात्र अद्यापही या सीमा सुरू न झाल्याने टोमॅटोच्या दरात घसरण दिसून येत आहे. सीमा खुल्या झाल्यानंतर पुढील आठवड्यात दरात वाढ होऊ शकते. उत्पादन खर्च जास्त अन् उत्पन्न मात्र कमी गत महिन्यात टोमॅटोला चांगला दर मिळत होता. त्यामुळे असे वाटत होते की, हा दर पुढील काही महिने टिकून राहील, मात्र, आठ दिवसापासून हा दर खूपच कमी मिळत आहे. शेतातून टोमॅटो खुडून बाजार समितीत विक्री आणण्यासाठी सरासरी एका कॅरेटसाठी १६० रुपये खर्च येत आहे. मात्र, हातात सरासरी फक्त १५० रुपये मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत सापडला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech