त्रंबकेश्वर : राज्य शासनाने स्थापित केलेल्या सिंहस्थ कुंभ पर्व समितीमध्ये सहभागी करून न घेतल्यामुळे साधु महंतांनी तेरा आखाड्यांनी नाराजी व्यक्त केली असून बहिष्कार टाकण्या संदर्भातला इशारा देखील दिला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. राज्य शासनाने नाशिक त्रंबकेश्वर मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभ परवासाठी समितीची घोषणा केली या शासकीय साहित्यांची घोषणा करण्यात आली या घोषणा करत असताना कुठल्याही समितीमध्ये साधू महंतांचे प्रतिनिधी म्हणून कुठल्याही आखाड्यांचे प्रमुखांना स्थान देण्यात आलेले नाही यावरून नाशिक त्रंबकेश्वर या दोन्हीही ठिकाणी असलेल्या आखाड्यांच्या साधु महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या सर्व प्रश्नावरती शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे बैठक घेतली या बैठकीला आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज शंकरानंद सरस्वती गोपालदास महाराज यांच्यासह अन्य साधू महंत उपस्थित होते. या बैठकीमध्ये या सर्व विषयावरती चर्चा करून शासनाने शासकीय समित्यांवरती साधू महंतांचे प्रतिनिधी न घेणे या विषयावरती नाराजी व्यक्त करून जर साधू महंताना समितीमध्ये स्थान दिलं नाही तर या सर्व प्रश्नांची बहिष्कार टाकून पुढील निर्णय घेतला जाईल असा निर्णय घेण्यात आला पण हा सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. यामुळे साधु महंतांन ची नाराजी आता सरकार कसे दूर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.