मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप दिवसांपासून उत्सुक आहेत. शाहरुख शेवटचं २०२३ मधील ‘डंकी’ या चित्रपटात दिसला होता. आता तो लवकरच आगामी चित्रपट ‘किंग’ मध्ये झळकणार आहे.सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, पण दरम्यान या चित्रपटाच्या सेटवरून शाहरुख खानचा लूक लीक झाला आहे. इतकंच नव्हे, तर अभिषेक बच्चन आणि सुहाना खान यांचा देखील फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ‘किंग’च्या सेटवरून अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये शाहरुख पांढऱ्या शर्टमध्ये, डोक्यावर बेज रंगाची हॅट आणि चेहऱ्यावर राखाडी दाढीसह दिसत आहे. या लूकमध्ये त्याच्या मानेला एक टॅटूही दिसून येत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये शाहरुखचा आणखी डॅशिंग अंदाज पाहायला मिळतो. शॉर्ट हेअरकट, संपूर्ण शरीरावर टॅटू, डोळ्यांवर गॉगल आणि बाइकवर बसलेला त्याचा स्टायलिश लूक पाहून चाहत्यांमध्ये ‘किंग’ बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘किंग’च्या सेटवरून सुहाना खानचाही एक झलक समोर आला आहे.फोटोमध्ये ती क्रू मेंबर्ससोबत उभी असून, ब्राऊन ट्यूब टॉप आणि बेज पॅंटमध्ये खूपच कूल लूकमध्ये दिसतेय.अभिषेक बच्चनचाही फर्स्ट लूक सध्या व्हायरल आहे, ज्यामध्ये तो मोठ्या दाढीत आणि ब्लेझरमध्ये दिसत आहे – एक दमदार आणि इंटेन्स लूक. ‘किंग’ चित्रपट सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे आणि यामध्ये अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. शाहरुख खान, सुहाना खान,अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण
राणी मुखर्जी,जयदीप अहलावत, अभय वर्मा,अरशद वारसी, सौरभ शुक्ला यांचा समावेश आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ‘किंग’ हा चित्रपट शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक भव्य पर्वणी ठरणार आहे. स्टारकास्ट, लूक आणि सेटवरील झलक पाहता, याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २०२६ मध्ये येणारा हा चित्रपट निश्चितच प्रेक्षकांच्या अपेक्षा गाठू शकतो.