सोनू सूद बेटिंग अ‍ॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर

0

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाला आहे. बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप (‘वनएक्सबेट’) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी त्याची चौकशी करत आहे. अभिनेता सोनू सूद दुपारी १२ वाजताच्या सुमारास नवी दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात पोहोचला. या प्रकरणातील तपास अधिकारी अभिनेता सोनू सूदची चौकशी करतील आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत त्याचा जबाब नोंदवणार आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणेने आतापर्यंत माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवन, रॉबिन उथप्पा आणि युवराज सिंग तसेच माजी तृणमूल काँग्रेस खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि बंगाली अभिनेता अंकुश हजरा यांची या प्रकरणात चौकशी केली आहे. मंगळवारी ईडीने त्याच प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगची जवळपास सात तास चौकशी केली होती. ‘वनएक्सबेट’ ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या कारवायांची चौकशी ही ईडीच्या अशा प्लॅटफॉर्मविरुद्धच्या व्यापक तपासाचा एक भाग आहे. ज्यांवर लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आणि मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर चुकवल्याचा आरोप आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech