अॅटलॉस मॉथ’; आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यापूर्वी रायगड, सांगली जिल्ह्यात आढळला

0

अॅटलॉस मॉथ’ :  आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळून आला आहे यापूर्वी रायगड, सांगली जिल्ह्यात आढळला होताजगातल्या सर्वांत मोठ्या फुलपाखरांपैकी एक असलेले ‘अॅटलास मॉथ’ या जातीचे फुलपाखरू आहे या फुलपाखराचे वैशिष्ट्ये म्हणजे.. पंखांच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार असल्याने अॅटलास मॉथ दुर्मीळ आणि जगातील सर्वांत मोठ्या पतंगापैकी एक असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. हा एक अत्यंत मोठा आणि दुर्मीळ पतंग आहे. तो सहसा आशियातील जंगलांमध्ये आढळतो. त्याची रंगसंगती व नक्षीकाम नागाच्या डोक्यासारखे दिसते. ज्यामुळे त्याला एक नैसर्गिक संरक्षण मिळते. या पतंगाचे आयुष्य साधारणपणे पाच ते सात दिवसांचे असते. या काळात ते वीण करण्यासाठी आणि प्रजनन करण्यासाठी ऊर्जा वाचवतात. प्रौढ पतंग अन्न खात नाहीत. सुरवंट अवस्थेत असताना दालचिनी, लिंबूवर्गीय आणि पेरूच्या झाडांची पाने खाऊन ते ऊर्जा साठवतात.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech